
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील मासरंग व निवळी धनगरवाडी ला जोडणार्या रस्त्याला पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करुन दिला होता या रस्त्याच्या भुमिपुजनासाठी पालकमंत्री रविंद्र वायकर मासरंग धनगरवाडीत आले होते मासरंग धनगरवाडीचा खडतर प्रवास करुन पालकमंत्री या ठिकाणी पोहचले. आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य पोहचू शकले नाही अशा दुर्गम वाडीत पालकमंत्री रविंद्र वायकर आल्याने स्थानिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पालकमंत्र्यांच्या भेटीने मासरंग धनगरवाडीतील धनगर समाज भारावून गेला.
मासरंग धनगरवाड्यांसारख्या अनेक वाड्या डोंगराळ भागात असून विकासापासून वंचित आहेत अशा दुर्गम वाड्यांचे पुनर्वसन करण्याचा माझा मानस आहे मासरंग धनगरवाडीतील कुटुंबाचे सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल मला तातडीने सादर करावा असे निर्देश पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी यावेळी संगमेश्वर (देवरुख) तहसीलदारांना दिले.
मासरंग धनगरवाडी येथील रस्त्याच्या भुमिपुजन प्रसंगी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती सहदेव बेटकर, जि.प सदस्य संतोष थेराडे, पंचायत समिती सभापती, सोनाली निकम,जिल्हा नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे, शिवसेना विभागप्रमुख जयवंत बने, कडकई सरपंच वसंत उजगांवकर यांच्या सह शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.




























































