गुरमित रामरहीम याला कोरोनाचा संसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित रामरहीम याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव तीन दिवसांपूर्वी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले होते.

पोटात दुखत असल्याने रामरहीम याची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. डेराप्रमुख रामरहीम दोन महिला अनुयायांवर केलेल्या बलात्कारप्रकरणी 2017 पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.