हडपसरमध्ये एकाचा मोबाइल हिसकाविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दुचाकीस्वार चोरट्यांनी एका व्यक्तीचा फोन हिसकावून नेला. ही घटना 27 जुलैला रात्री अकराच्य सुमारास हडपसरमधील हांडेवाडी चौकात घडली. दत्ता काळदंते (वय 51 रा. सातवनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता हे कुटूंबियासह सातवनगरमध्ये राहयला आहेत. 27 जुलैला रात्री अकराच्या सुमारास ते घरानजीक रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी त्यांनी पत्नीसोबत बोलण्यासाठी खिशातून मोबाइल बाहेर काढला. नेमकी तीच संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील पाच हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग शेळके तपास करीत आहेत.