हडपसरमध्ये ट्रकच्या धडकेत महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात 30 मार्चला हडपसर परिसरातील आकाशवाणीनजीक घडला. याप्रकरणी ट्रकचालकाविरूद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुनिता सतीश शिंदे (वय 40 रा. भेकराईनगर, हडपसर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा रोहित शिंदे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपुर्वी सकाळी साडेआठच्या सुमारास रोहित आणि त्यांची आई सुनीता दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी आकाशवाणी परिसरात अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ट्रकचे चाक सुनिता यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.