केनच्या हॅट्ट्रिकने बायर्नला पोकल फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॅरी केनच्या दुसऱ्या सत्रातील हॅटट्रिकच्या जोरावर बायर्न म्युनिकने डीएफबी-पोकल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हीएफबी स्टुटगार्टचा 3-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 2020 नंतरचा हा बायर्नचा पहिलाच किताब ठरला.

बायर्नलाही पहिल्या सत्रात लय सापडत नव्हती. पण दुसऱ्या सत्रात मात्र सामन्याचे चित्र पालटले. 55 व्या मिनिटाला मायकल ऑलिसेच्या अचूक क्रॉसवर केनने हेडरद्वारे पहिला गोल केला. त्यानंतर बायर्नने सामन्यावर नियंत्रण मिळवले. 80व्या मिनिटाला लुईस डायझसोबतच्या सुंदर चालीवर केनने दुसरा गोल झळकावला. स्टॉपेज टाइममध्ये स्टिलरच्या हँडबॉलमुळे मिळालेल्या पेनल्टीवर केनने गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

या विजयासह बायर्नने विक्रमी 21 व्यांदा डीएफबी-पोकल जिंकला. प्रशिक्षक व्हिन्सेंट कॉम्पनी यांनी दुसऱ्या सत्रातील संघाच्या खेळाचे कौतुक केले, तर स्टुटगार्टचे प्रशिक्षक सेबॅस्टियन होनेस यांनी 55 मिनिटांपर्यंत संघाने उत्कृष्ट खेळ केल्याचे सांगितले.