ओटस् की कॉर्न फ्लेक्स, यापैकी नाश्त्यासाठी जास्त पौष्टिक काय ? जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओटस् आणि कॉर्न फ्लेक्स हे दोन्ही पदार्थ सकाळच्या न्याहारीमध्ये समाविष्ट करणासाठी उत्तम पर्याय आहेत. हल्ली ऑफिसला जाणाऱ्यांना सकाळच्या वेळी नाश्ता करायला वेळ मिळत नाही, असे लोक ओटस् किंवा कॉर्न फ्लेक्स खाणं पसंत करतात. कारण हे दोन्ही पदार्थ अगदी कमीतकमी वेळेत तयार होणारे आणि पौष्टिक आहेत, असे असले तरीही ओटस की कॉर्न फ्लेक्स या दोन्ही पदार्थांपेक्षा कोणत्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात पोषण मूल्ये आहेत, याविषयी माहिती असणं गरजेचं आहे.

कॉर्नफ्लेक्समधील पौष्टिक घटक
हे मक्यापासून तयार केले जातात. 100 ग्रॅम कॉर्नफ्लेक्समध्ये 0.4 ग्रॅम फॅट, 84 ग्रॅम कार्ब्स, 7.5 ग्रॅम प्रथिने, 1.2 ग्रॅम फायबर, 2 टक्के कॅल्शियम आणि एकूण 378 कॅलरीज असतात.

कॉर्न फ्लेक्स खाण्याचे फायदे
-कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्याकरिता आहारात याचा समावेश करतात.

– कॉर्न फ्लेक्स दुधासोबत खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. यामध्ये मध आणि बदाम खाल्ल्यास एंजाइम्सकरिता फायदेशीर ठरते. शिवाय फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.

– डाएटिंग करणाऱ्या व्यक्तिंना विशेषत: ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्याकरिता हा उत्तम नाश्ता आहे. यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्याकरिता मदत होते. कॉर्न फ्लेक्स खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही.

ओट्समधील पोषक घटक
ओटसमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामध्ये बीटा ग्लुकेन असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समध्ये 10.8 ग्रॅम फॅट, 26.4 ग्रॅम प्रथिने, 16.5 ग्रॅम फायबर, 103 ग्रॅम कार्ब्स, 8 टक्के कॅल्शियम आणि एकूण 607 कॅलरीज असतात.

ओट्स खाण्याचे फायदे
– फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ओटस खाल्ल्याने मेटाबॉलिजम (चयापचय क्रिया) वाढते. ओट्स खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

– सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश केल्याने बराच काळ भूक लागत नाही. पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

ओट्सला लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड मानले जाते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि ह्रदयाचे आरोग्यही उत्तम राहते. नियमित ओट्स खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो.
न्याहारीकरिता दोन्ही पदार्थ उत्तम आहेत, मात्र जे लोकं शारीरिकदृष्ट्या जास्त सक्रीय असतात त्यांच्याकरिता कॉर्न फ्लेक्स हा चांगला पर्याय आहे. मधुमेही रुग्णांनी ओट्स खाणे उत्तम.