
अनेकदा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशात जळजळ होते. आंबट ढेकर येतात, पोट फुगते, आणि अस्वस्थ वाटते. याला ऑसिडिटी असे म्हणतात.
पोटभर जेवल्यानंतर लगेच आडवे होऊ नका किंवा झोपू नका. त्यामुळे पोटातील पाचक आम्ल अन्ननलिकेत वरच्या बाजूला येते आणि छातीत तीव्र जळजळ होते.
पोटभर खाणे टाळा, अन्न पूर्णपणे चावून खा, मसालेदार आणि तेलकट पदार्थांपासून दूर रहा. योग्य पद्धतीने पाणी प्या. असे झाल्यास बडीशेपचे पाणी, केळी, पपई, नारळ पाणी, थंड दूध याचे सेवन केल्यास त्वरित आराम मिळतो.































































