पावसाने झोडपले, गुहागरमध्ये २४८ मिलीमीटर पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हयात पाऊस पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ वीस तासात ११५.२२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत ९३१.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
मंडणगड- ११०.०० मिलीमीटर
दापोली- १२२.०० मिलीमीटर
खेड- ९६.०० मिलीमीटर
गुहागर- २४८.०० मिलीमीटर
चिपळूण-६२.०० मिलीमीटर
संगमेश्वर- ६९.०० मिलीमीटर
रत्नागिरी – २०३.०० मिलीमीटर
लांजा – ७०.०० मिलीमीटर
राजापूर – ५७.०० मिलीमीटर

रविवारी सकाळी १० वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यात मौजे दाभोळ येथे मुराद पाल नाईक यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मौजे मासेगुजर येथील व हर्णे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मौजे आंर्जल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मौजे मुरडी येथे जोग नदीची संरक्षण भिंत कोसळली आहे.

लांजा तालुक्यात मौजे वाडगाव येथील गजेंद्र सदाशिव गोसावी (वय ४५ वर्षे ) हे बेर्डेवाडी येथे लघुपाटबंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले असता पाटबंधाऱ्यातील गाळात अडकूण मयत झाले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.