मुसळधार पावसामुळे गोव्यात जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पणजी

गोव्यात पावसाने कहर केला असून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. बुधवारी दुपार नंतर मुसळधार पावसामुळे दाबोळी विमानतळावर उतरणारी १६ विमाने अन्यत्र वळवावी लागल्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळावर अड़कून पडले आहेत.

हवामान खात्याने बुधवारी गोव्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवार आणि गुरुवारी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोव्यात काही भागात अती ते अती मूसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत.तर सखल भागातील वस्ती मध्ये घरात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक खंडित झाली होती. राजधानी पणजी मधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. समुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांनी समुद्रात उतरु नये असा इशारा दृष्टि लाइफ गार्ड संस्थेने दिलेला आहे.पावसामुळे नदया,नाले दुथडी भरून वाहत आहेत.