
सामना प्रतिनिधी । पेण
पेण तालुक्याला पावसाने झोडपले असून या पाावसामुळे पेण शहरात जागोजागी पाणी साचले होते. तर वारंवार विजपुरवठा खंडीत झाल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागला.
सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. भाताची रोपे कुजल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान या पावसामुळे भाजीसाठी मुंबई पुणे येथे जाणार्या भाज्यांच्या गाड्या कमी आल्याने भाजीपाला महागला आहे.
या जोरदार पावसामुळे पेण शहरांतील विक्रम स्टॅंड, धरमतर मार्ग, बाजारपेठ, विठ्ठल आळी, कोळीवाडा, महावीर मार्ग, चिंचपाडा, उत्कर्ष नगर आणि इतर सखल भागात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना फार ञास सहन करावा लागला.




























































