
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई-ठाण्यात मान्सूननं प्रवेश करण्यास सुरुवात केली असून मध्यरात्रीपासून मुंबई-ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबई-ठाणेकरांना थोडा दिलासा मिळाला असला तरी ढगांचा पुंजका दक्षिण मुंबईच्या दिशेनं सरकत असल्याची माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे. रडारवर ढगांची हालचाल नोंदवण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या भांडुप-मुलुंड-दहिसर-बोरिवली-कांदिवली-वांद्रे-अंधेरी या भागांमध्ये पाऊस सुरू आहे. पुढले ४८ तास मुंबई-ठाणे परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गोवा-कोकणातून मान्सून हळूहळू पुढे सरकत असून मुंबई-ठाण्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. भिवंडी, मुंब्रा परिसरातील कौसा तसेच सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र असं असलं तरी पावसाच्या आगमनाने वातावरणात आलेला गारवा रहिवाशांना सुखावत आहे.
LIVE अपडेट:
मालवणात धुव्वाधार पावसाची विक्रमी बरसात
- मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात
पाहा मुंबईचा पाऊस आणि रेल्वे -
-
मान्सूनचं मुंबईत दमदार आगमन, हवामान खात्याची माहिती
- वाचा सविस्तर: उत्तन येथे वीज कोसळून एक ठार
- पाहा व्हिडीओ: चर्चगेट परिसरात मुसळधार पाऊस
- हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत
- मध्य रेल्वेनंतर हार्बर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत
- समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला
- लोकल ३५-४० मिनीटे उशीराने उशीराने धावत आहेत
- पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
- मुक्कामी पावसाने बीड जिल्ह्याला धुतले
- मुंबई लाईफ लाईन मध्य रेल्वे थोड्या उशिराने धावत असल्याची माहिती मिळते. प्रवाशांना फटका…
- दक्षिण मुंबईत आणखी मुसळधार पावसाची शक्यता, ढगांची हालचाल रडारवर नोंदवण्यात आली
Radar shows cloud build up over #Mumbai. #Rains are expected to continue as another band of clouds can be seen approaching from the south. #MumbaiRains #MumbaiMonsoon pic.twitter.com/1d6oUkffBG
— SkymetWeather (@SkymetWeather) June 9, 2018
- मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली
- मुंबईत पहाटे ५.३० पर्यंत २५ मिमी पाऊस, सांताक्रूझ वेधशाळेत नोंद
#Santacruz observatory of #Mumbai received 25 mm of #rain till 0530 hours. #Mumbairain @SkymetWeather
— Mahesh Palawat (@Mpalawat) June 9, 2018
Heavy rain lashes parts of #Maharashtra; pictures of water-logged streets in Thane’s Kausa area. pic.twitter.com/Uik6LamXwc
— ANI (@ANI) June 8, 2018
- मुंबईत मुलुंड परिसरात रात्रीपासून चांगला पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे काही भागात वृक्षही पडल्याचं पाहायला मिळालं.

-
- दादर, एलफिन्स्टन, वांद्रे, अंधेरीसह मुलुंड, ठाणे आणि भांडूपमध्ये पावसाचा जोर वाढला
- गोव्यात मान्सूनचं दमदार आगमन झालं


























































