आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या मदतीसाठी बाप्पा धावला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या मदतीसाठी साक्षात विघ्नहर्ता गणरायच धावून आला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तब्बल आठ लाख 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती सिद्धिविनायक मंदिर न्यासाने दिली आहे.

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आता दुष्काळग्रस्त भागातील 12 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आठ लाख 48 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. यापैकी प्रियंका गवळी ही विद्यार्थिनी बीडीएसचे शिक्षण घेत असून तिला 3 लाख 18 हजारांची मदत करण्यात आली आहे. मदत करण्यात आलेले इतर विद्यार्थी परभणी जिह्यातील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक शाळेमधील आहेत.