
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
हिंदुस्थानी खेळणी उद्योगाने अवघ्या तीन वर्षांत जी करामत केली, ती वाखाणण्याजोगी आहे. हिंदुस्थानात 2018-2019 या वर्षात 371 अब्ज डॉलर्सच्या खेळण्याची आयात करण्यात आली. खेळणी उद्योगाला प्रोत्साहन मिळाल्यानंतर आयातीचा हा आकडा 2021-22 मध्ये घटून 110 अब्ज डॉलर्सवर येऊन ठेपला. खेळणी उद्योगाने कात टाकल्यामुळे हा सकारात्मक बदल घडून आला. जनता हिंदुस्थानी वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षातही उतरवून दाखवील. हा संकल्प देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर घेऊन जाईल असा विश्वास बाळगू या !
खेळण्यांच्या मार्पेटमधील हिंदुस्थानी खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्पेट चीनला बहाल केले होते. स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी हिंदुस्थानी खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल. स्वस्त किमतीमुळे चिनी खेळण्यांनी हिंदुस्थानी बाजारावर कब्जा केला होता, पण त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. चिनी खेळण्यांत कनिष्ठ दर्जाचे प्लॅस्टिक व अन्य खराब कच्च्या मालाचा वापर केला जात असे. तथापि दर्जा नियंत्रण आदेश लागू झाल्याने असा माल हिंदुस्थानात येणे कमी झाले व देशांतर्गत उद्योगवाढीला संधी मिळाली.
स्वस्त आणि आकर्षक या दोनच गोष्टींमुळे चिनी खेळण्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असली तरी त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे तज्ञ सांगतात. चायनीज खेळण्यांच्या आयातीला परवानगी नाही. असे असतानाही तस्करीमुळे ही खेळणी विक्री होत आहे. खेळण्यांवर होणारी प्रक्रिया पर्यावरणपूरक नसल्याने ती शरीरास अपायकारक आहेत. चायनीज वस्तू तोंडात घातल्याने त्यातील घातक रसायनांमुळे विषबाधा होण्यासह त्वचेलाही इजा पोहोचण्याची शक्यता असते. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने दिल्ली येथे घेतलेल्या 45 सॅम्पल्समध्ये 29 मध्ये विषारी पदार्थ आढळले. चीनकडील ही आयात रोखण्यासाठी सरकारने या वर्षी फेब्रुवारीत खेळणी आयात शुल्कात 200 टक्क्यांची वाढ केली होती, परंतु खेळण्यांची आयात अजूनही सुरूच आहे.
खेळण्यांशिवाय बालपण असूच शकत नाही. त्यामुळेच हिंदुस्थानात पारंपरिक खेळणी रुजलेली दिसतात. हिंदुस्थानी खेळण्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. हिंदुस्थानी खेळणी उद्योगाची उलाढाल 10 हजार कोटी रुपये आहे. मात्र जागतिक खेळणी उद्योगातील हिंदुस्थानचा वाटा 0.5 टक्के आहे. त्यामुळे या बाजारपेठेत मुसंडी मारायला हिंदुस्थानला वाव आहे. मात्र आधी देशातील खेळण्यांच्या मार्पेटकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यातून हजारो कारागीरांचा रोजगार टिकून राहील.
हिंदुस्थानी बाजारपेठेतून चिनी खेळणी हद्दपार करायला हवीत. हिंदुस्थानी खेळणी थोडी महाग असली तरी ती आम्ही खरेदी केली पाहिजेत. या कृतीतून आपल्याला देशभक्ती दाखवता येते. शैक्षणिक आणि वैज्ञानिक स्वरूपाच्या खेळण्यांना येत्या काही काळात चांगले दिवस येतील. पर्यावरणपूरक खेळण्यांची मागणीही वाढेल. गेम्स, पझल आणि ऑनबोर्ड गेम्सना जगभर नेहमीच मागणी असते. इलेक्ट्रॉनिक खेळण्यांचेही मोठे मार्पेट आहे. पारंपरिक आणि आधुनिक अशी दोन्ही खेळणी मुलांना आवडतात आणि हे लक्षात घेऊन ‘लेगो’ या जगप्रसिद्ध खेळणी उत्पादक पंपनीने लाकडाच्या काही खेळण्यांचे रूपांतर इलेक्ट्रॉनिक खेळण्यांमध्ये केले. हिंदुस्थानी उद्योजकांनाही हा कित्ता गिरवावा लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानी खेळणी महोत्सव 2021 चे उद्घाटन केले होते. हिंदुस्थानातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपूरक आणि मनःस्वास्थ्याला अनुकूल अशी खेळणी बनवावीत. लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खेळणी महत्त्वाची भूमिका निभावतात. हिंदुस्थानी खेळणी महोत्सव 2021 हे ‘आत्मनिर्भर भारता’ची निर्मिती आणि हिंदुस्थानच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.
खेळणी महोत्सव हा व्यावसायिक उपक्रम नसून हिंदुस्थानच्या पुरातन क्रीडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न आहे. हिंदुस्थानने जगाला बुद्धिबळासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रीडा प्रकार दिले आहेत. खेळणी उद्योग जगतात अफाट क्षमता दडलेली आहे. ही क्षमता आपण ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या माध्यमातून अधिक पटीनं वाढवू शकतो. तसेच हिंदुस्थानात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱया दरात उपलब्ध होतात. ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली असल्यामुळे ती सुरक्षित असतात.
हिंदुस्थान प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदुस्थानात तब्बल 80 टक्क्यांपेक्षा अधिक खेळणी चीनमधून येत असत. तथापि, आता यात फार मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात खेळणी उद्योग वेगाने फळू-फुलू लागला आहे. केवळ तीन वर्षांच्या अवधीत हिंदुस्थानात खेळण्यांच्या आयातीत सुमारे 70 टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर हिंदुस्थान आता अन्य देशांतही आपल्याकडे तयार केलेल्या खेळण्यांची निर्यात करत आहे. गेल्या तीन वर्षांत खेळण्यांच्या निर्यातीत 61 टक्क्यांपर्यंत वृद्धी पाहायला मिळाली. ‘व्होकल फॉर लोकल’ आवाहन हिंदुस्थानी खेळणी क्षेत्रित परिवर्तन आणत आहे.
व्यापार व उद्योग मंत्रालय लवकरच खेळण्यांच्या आयातीवर लायसन्स पद्धत सुरू करत आहे, ज्यामुळे हिंदुस्थानी खेळणी उद्योग आत्मनिर्भर बनण्याची आशा आहे. देशात खेळण्यांच्या निर्मितीचे अनेक क्लस्टर आहेत आणि शेकडो कारागीर स्वदेशी खेळण्यांची निर्मिती करत आहेत. खेळणी केवळ उद्योगासाठीच नसतील तर मुलांच्या बौद्धिक विकासासाठी ती मदत करतील. सर्व अंगणवाडी, सरकारी शाळांमध्ये खेळण्यांच्या माध्यमातून शैक्षणिक काम केले जाऊ शकते. तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांसाठी या उद्योगात तरुणांना जोडले जावे. या कामासाठी देशातील तरुणांमध्ये स्पर्धा घेण्यात यावी. खेळण्यांच्या निर्यातीने मोठी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. निर्यातीत वाढ होऊन आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ती 326 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. अर्थात खेळण्यांतील निर्यात सहजासहजी झालेली नाही, तर ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाने हिंदुस्थानी खेळणी क्षेत्राला बळकटी देण्याचे काम केले.






























































