
सामना प्रतिनिधी । ठाणे
स्मार्ट सिटीचा वेग पकडलेल्या ठाणे शहरात एकीकडे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असतानाच पूर्वेच्या मीठबंदर रोड येथे रस्त्याच्या खोदकामात भरवस्तीत ब्रिटिशकालीन रूळ सापडले. या रूळांकरून 1960-65 पर्यंत मीठबंदर ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान मीठ व कोळशाची ने-आण करणारी मालगाडी जात असल्याच्या आठवणी शहरातील जुनेजाणते ठाणेकर सांगतात.
अगदी दोन कर्षांपूर्वी कुलाबा येथील हुतात्मा चौकात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ट्रामचे रूळ सापडले होते. पुढे त्याचे ऐतिहासिक मूल्य जपण्यासाठी या रूळांचे बेस्टच्या आणिक डेपोतील संग्रहालयात जतन करण्यात आले. याच धर्तीकर इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या मीठबंदर रोड येथील रेल्वे रूळांना पुन्हा नकी झळाळी द्याकी, अशी मागणी ठाणेकरांकडून केली जात आहे.





























































