हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एक कोरोना संशयित दाखल

1071
फोटो- प्रातिनिधीक

हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका कोरोना संशयित 54 वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेला 54 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण कोरोनाग्रस्ताच्या जवळून संपर्कात आल्याचे सांगण्यात आले आहे. या संशयित रुग्णाच्या स्रावाचे नमुने संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर परदेशामधून जिल्ह्यात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाइन म्हणून ठेवण्यात आले. यामध्ये ऑस्ट्रेलियातुन आलेले दोन,  मालदीवमधील 2 व कझाकीस्तानमधील एकाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या