
सामना ऑनलाईन । मदुराई
देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती नुकतीच तमिळनाडूच्या मदुराईत पहायला मिळाली. एका बसने दुचाकीवर स्वार असलेल्या तीन प्रवाशांना उडवले. पण किरकोळ जखम सोडल्यास तिघांना कुठलीच हानी झाली नाही. एवढ्या भीषण अपघातातही हे तिघे वाचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
#WATCH: Dramatic visuals of 3 men miraculously surviving in Madurai after they came under the wheels of a moving bus belonging to #TamilNadu State Transport Corporation. Bikers were reportedly in an inebriated state. They were admitted to hospital with minor injuries. (16.09.18) pic.twitter.com/1zY621LZlr
— ANI (@ANI) September 22, 2018
मदुराई शहरात १६ सप्टेंबर रोजी हा अपघात झाला. एका दुचाकीने उजव्या बाजूला वळण घेतले. पण तिथून एक बस त्यांना न दिसल्याने त्यांना जोरदार धडक दिली. बसचालकानेही प्रसंगावधान राखून तत्काळ ब्रेक मारल्याने पुढील अनर्थ टळला. जमा झालेल्या लोकांनी या अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाख केल्यावर त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे कळाले.




























































