माळेगाव यात्रेतील श्री खंडोबा अश्वस्पर्धेची सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर 

देशभरात प्रसिध्द असलेली व उज्ज्वल परंपरा लाभलेली माळेगाव यात्रा प्रति वर्षाप्रमाणे पार पडली. ज्यामध्ये सर्वांचे आकर्षण ठरली ती म्हणजे श्री खंडोबा अश्वस्पर्धा-2019 या अश्व स्पर्धेत मोठ्या प्रमाणात अश्व पालकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने ही स्पर्धा  आयोजित केली होती. देश पातळीवरील ही संस्था अश्वाच्या पालन-पोषणपासून त्यांच्या देखभालीसाठी सातत्याने काम करत आली आहे.

माळेगाव यात्रेतील अश्व स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून स्व.दगडोजीराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री खंडोबा अश्वस्पर्धा-2019 ही स्पर्धा आयोजित केली गेली.  मारवाडी मादी प्रथम रुक्मीणी (अश्व मालक सुशिल/शशांक हगौणे), मारवाडी मादी द्वितीय सोनी (अश्व मालक दिलीपराव देशमुख), मारवाडी मादी तृतीय कृष्णा (अश्व मालक हंसराज अप्पाराव पाटील), मारवाडी नर प्रथम सुर्यदेव (अश्व मालक खंडू कलाटे), मारवाडी मादी द्वितीय देवराज (अश्व मालक दिलीपराव देशमुख), मारवाडी मादी तृतीय स्वक्ष (अश्व मालक धिरज विलासराव देशमुख), नुकरा मादी प्रथम दामिनी (अश्व मालक धिरज विलासराव देशमुख) यामध्ये प्रथम येणा­यास 21 हजार रु., द्वितीय येणा­र्‍यास 15 हजार रु., व तृतीय येणा­यास 11 हजार रु. अशा स्वरुपाचे बक्षीस देण्यात आले.

सदरील बक्षीस महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, एस.आर. देशमुख, आबासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.  स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी धिरज विलासराव देशमुख, जितेंद्र पहाडीया, समीर राठी, मयुर धवन, जिशान खोरीवाले यांचे मोलाचे योगदान राहीले.