मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह देण्यासंदर्भात प्राधान्याने प्रश्न सोडविणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

संपूर्ण विदर्भातून नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्राधान्याने प्रश्न सोडविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकल मराठा समाज नागपूरच्या युवा कार्यकारिणी समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

रामगिरी येथे नागपूर सकल मराठा समाज युवा कार्यकारिणीचे शिष्टमंडळाने भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उपलब्ध करुन देण्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, युवा कार्यकारिणीचे प्रमुख लक्ष्मीकांत किरपाने, जयसिंग भोसले, आशिष निंबाळकर, संकेत किरपाने, निखिल बाजळ यांने मुख्यमंत्र्यांना मागणी संदर्भात निवेदन सादर केले.

उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर येथे संपूर्ण विदर्भातील शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेण्यास अडचणी येत असल्यामुळे तसेच भाड्याने राहण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी रोजगारासाठी स्थानांतरित होत असलेल्या मराठा समाजांच्या नागपूर शहरात शासनाच्या जागेवर सर्व सुविधा असणारे मराठा वसतीगृह उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे सकल मराठा समाज नागपूरच्या युवा कार्यकरणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.