व्हॉट्सअप स्टेटस आवडलं? मग ‘Plz send me’ न म्हणता फक्त मिनिटभरात करा डाऊनलोड

जगभरात मेसेज, फोटो, व्हिडीओ, ऑडिओ पाठवण्यासाठी आणि ऑडिओ-व्हिडीओ, ग्रुप व्हिडीओ कॉल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअप अॅपमध्ये नवनवीन बदल होत असतात. व्हॉट्सअपने आतापर्यंत अनेक नवनवीन फिचर्स युजर्सला दिली आहेत. यातील एक लोकप्रिय फिचर्स म्हणजे स्टेटस.

व्हॉट्सअप युजरला स्टेटसला आपले विचार मांडता येतात, फोटो किंवा व्हिडीओही स्टेटस म्हणून ठेवता येतात. बऱ्याचदा मित्रयादीत असणाऱ्यांचे स्टेटस आपल्याला आवडतात आणि मग आपसूकच ‘Plz send me’ अर्थात मला पाठव ना असा मेसेज पाठवला जातो. काही जण स्क्रिनशॉटही काढतात. मात्र व्हिडीओसाठी त्या व्यक्तीकडे मागणी करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नसतो. मात्र आज आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत.

अरे वा! आता डेस्कटॉपवरून WhatsApp व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करता येणार

यासाठी युजरसा कोणत्याही अॅपची गरज भासणार नाहीय. तुम्ही कोणत्याही अॅपची मदत न घेता तुम्हाला आवडणारे व्हिडीओ स्टेटस तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकणार आहात. चला तर मग याबाबत अधिक जाणून घेऊया…

– यासाठी सर्वात आधी तुम्हाला आवडलेले स्टेट्स ओपन करावे लागेल. ज्याला तुम्ही डाउनलोड करायचे आहे.

– यानंतर फोनच्या फाइल मॅनेजर मध्ये जा. हे प्रत्येक फोनमध्ये इनबिल्ट असतात. जर तुमच्या फोनमध्ये हे नसेल तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा.

– फाइल मॅनेजरच्या सेटिंगमध्ये जा. मग Show Hidden System Files सेटिंगला ऑन करा.

– मग पुन्हा फाइल मॅनेजरच्या होम पेजवर या. या ठिकाणी फोनची इंटरनल मेमरीचा पर्याय तुम्हाला दिसेल. यावर जा.

– मग WhatsApp फोल्डरच्या मीडिया फोल्डरला ओपन करा. या ठिकाणी तुम्हाला स्टेस्ट फोल्डर दिसेल. यात सर्व WhatsApp स्टेट्स दिसतील.

– जे स्टेटस तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. त्याला सिलेक्ट करून कॉपी करा आणि इंटर्नल स्टोरेजमध्ये पेस्ट करा.

व्हॉट्सऍप चॅटिंग होणार ‘कलरफुल’

आपली प्रतिक्रिया द्या