हे करून पहा – उन्हाळ्यात तयार करा नारळाचे दही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मे महिन्यामध्ये अतिशय कडक उैन असते. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम पदार्थ आहे. मात्र, अनेकांना दुग्धजन्य पदार्थ सहन होत नाहीत किंवा चालत नाहीत.

यावर पर्याय म्हणजे नारळाचे दही. एक कप नारळाच्या दुधाचे दही तयार करण्यासाठी एखाद चमचा साधे दही घ्या. एका भांडय़ात नारळाच्या दुधात साधे दही मिसळा. थोडावेळ हे मिश्रण चांगले मिसळून घ्या.

थोड्य़ा वेळात तुम्हाला नारळाचे दही तयार मिळेल. हे दही पचायला हलके असते. यामुळे उष्माघाताचा धोकादेखील कमी होतो.