एचसीजी कॅन्सर सेंटरचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कर्करोग दिन साजरा करत बोरिवली येथील एचसीजी कॅन्सर सेंटरने ‘द पॉवर ऑफ गुड विशेष’ मोहिमेचा भाग म्हणून कर्करोगमुक्त व्यक्तींसाठी कॅन्सर कॅन हिल फाऊंडेशनच्या सहकार्याने संगीत, कला आणि प्रेरणादायी संवादाच्या माध्यमातून विशेष समारंभाचे आयोजन केले होते. यात आर्ट प्रोग्राम, कॅन्सर सर्व्हायवर्स टॉक आणि म्युझिकल सत्राचा समावेश होता. कर्करोगाचा सामना करत असलेल्यांना प्रेरणादायी मदतीचा हात पुढे करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. संस्थेने आयोजित केलेल्या या विशेष समारंभात 200 व्यक्तींनी सहभाग घेतला. यात रुग्ण, त्यांचे केअरगिव्हर्स व कुटुंबीय आणि बोरिवली सेंटरमधील आरोग्यसेवा कर्मचारी यांचा समावेश होता. ‘कॅन्सर सर्व्हायवर्स टॉक’मध्ये प्रेरणादायी वक्ते व आध्यात्मिक प्रमुखांनी आयोजित केले आणि कर्करोगामधून वाचलेल्या व्यक्तींनी रुग्णांना व केअरगिव्हर्सना त्यांच्या गाथा सांगितल्या. म्युझिकल सत्रासह समारंभाची सांगता झाली. विशिंग वॉल उभारण्यात आली. भिंतीवर कर्करोगमुक्त व्यक्तींनी त्यांचे हृदयस्पर्शी प्रेरणादायी संदेश शेअर केले आणि कर्करोगाने पीडित रुग्णांनी स्टॉल उभारला होता. यावेळी हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राइजेज लिमिटेडचे जॉर्ज अॅलेक्स, आमदार मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.