बापरे! प्रदुषणामुळे पुरुषांच्या गुप्तांगात होतायत बदल, वैज्ञानिकांनी केला ‘हा’ दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या प्रदुषणामुळे वैज्ञानिकांकडून ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत. प्रदुषणाचा मानवी शरीरावर होणाऱ्या अपायांबाबतही आपण ऐकले आहे. मात्र यावेळेस शास्त्रज्ञांनी मानवी शरीरावर होणाऱ्या एका भयंकर परिणामाबाबत सांगितले आहे. प्लास्टिक निर्माणाकरताना वारण्यात येणाऱ्या केमिकलमुळे पुरुषांच्या गुप्तांगावरच थेट परिणाम होत आहे. या केमिकलमुळे जन्माच्या वेळी पुरुष जातीच्या बाळाचे लिंग (Penis) हे साधारण तुलने पेक्षा लहान होत असल्याचे दिसून आले आहे.

डॉक्टर शन्ना स्वान यांच्या रिसर्चनुसार, प्लास्टिक तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पथॅलेट्स या केमिकलचा पुरुषांच्या गुप्तांगांचा विकास करणाऱ्या हार्मोन निर्मितीवर परिणाम होतो असे समोर आले आहे. ‘जेव्हा महिला गरोदर असते त्यावेळी ती जर या केमिकलच्या संपर्कात आली तर तिच्या गर्भातील पुरुष जातीच्या बाळाच्या लिंग वृद्धीच्या हार्मोनवर परिणाम होतो. त्यामुळे ते बाळाचं लिंग कमी विकसित किंवा आकाराने लहान असं असतं.

हे जे केमिकल आहे ते प्लास्टिकला अधिक लवचिक बनविण्यासाठी मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये वापरले जाते. याचा बाळाच्या लिंग वृद्धीसोबतच पुरुषांच्या हार्मोन्सवर देखील याचा परिणाम होतो असे समोर आले आहे. काही पुरुषांच्या लैंगिक इच्छा कमी होताना दिसत आहे.

डॉक्टर स्वान या न्यूयॉर्कमधील माऊंट सिनाई रुग्णालयात कार्यरत आहेत. त्या 2017 पासून या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांनी याआधी केलेल्या अभ्यासानुसार गेल्या चार दशकांपासून पाश्चिमात्य देशातील पुरुषांच्या शरीरातील शुक्राणू (Sperm) ची संख्या कमी होत असल्याचे सांगितले होते.