आय फोन होणार मेड इन इंडिया, किंमती कमी होण्याची शक्यता

78

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानमध्ये निर्मिती झालेले आयफोन पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतात. त्यामुळे आयफोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारी दरबारी काही मंजूरी मिळणे बाकी आहे. असे झाल्यास आयफोन एक्सएस आणि एक्सआरच्या किंमती कमी होऊ शकतात.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार फॉक्सकॉन कंपनी ऍपल साठी हिंदुस्थानमध्ये फोनची निर्मिती करतात. हिंदुस्थानमध्ये आयफोन एक्सआर ची किंमत 56 हजार पासून सुरूवात होते तर एक्सएसची 1 लाख पासून. आतापर्यंत हिंदुस्थानमध्ये आयफोन आयात केले जातात. त्यावर 20% आयात शुल्क लावले जात होते. परंतु आयफोनची निर्मिती हिंदुस्थानमध्ये झाल्याने आता ग्राहकांचे भरपूर पैसे वाचू शकतात.

हिंदुस्थान ही जगातील्या दुसर्‍या क्रमाकांची स्मार्टफोनची बाजारपेठ आहे. तसेच हिंदुस्थानमध्ये आयफोन हा लोकप्रिय आहे, परंतु तो महाग असल्याने त्याचा मोठा ग्राहकवर्ग नाही. त्यामुळे हिंदुस्थानमध्ये त्याची मार्केट शेअर फक्त 1 टक्का आहे.

आपली प्रतिक्रिया द्या