Rafale आले की पाकड्यांची LOC जवळ फिरकण्याची देखील हिंमत होणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

हवाई दलाच्या ताफ्यात एकदा राफेल लढाऊ विमाने दाखल झाल्यास पाकिस्तानची नियंत्रण रेषेकडे किंवा सीमेच्या जवळ फिरकण्याचीही हिंमत होणार नाही असा विश्वास हवाई दल प्रमुखांनी केला आहे. रविवारी हवाई दलाच्या ताफ्यात चिनुक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर दाखल दाखल करण्यात आले. त्याप्रसंगी हवाई दल प्रमुख बी. एस. धानोआ बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “एअर स्ट्राइकच्या वेळी हिंदुस्थानक़डे राफेल असते, तर आपले एकही विमान पडले नसते आणि पाकिस्तानचे एकही विमान वाचले नसते, असे म्हणत राफेलवरून विरोधक राजकारण करत आहेत” असा आरोपही त्यांनी केला होता. मात्र राफेल लढाऊ विमाने खरेदी करारातील कथित भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेचा भडिमार केला होता. घोटाळा उघडकीस येण्यासाठी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. राफेलचे कंत्राट अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्याचे काम करण्यात आल्याचे आरोप झाले.