
ICC T20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी ‘हाय व्होल्टेज’ सामना म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सामना खेळण्यावर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवणं चुकीचं आहे. हा सामना थांबवला पाहिजे. खेळाडूंनाही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखलं पाहिजे. यासंदर्भात मी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिणार आहे.
भारत का पाकिस्तान के साथ मैच होना ग़लत है। भारत और पाकिस्तान(आगामी T-20 वर्ल्ड कप) के मैच को रोकना चाहिए। हमारे खिलाड़ियों को भी पाकिस्तान के साथ खेलने से मना कर देना चाहिए। इस बारे में मैं केंद्रीय खेल मंत्री अनुराग ठाकुर को पत्र लिखूंगा: केंद्रीय मंत्री रामदास अठावले, पुणे pic.twitter.com/DApg0s768o
— ANI_HindiNews (@AHindinews) October 19, 2021
रामदास आठवले यांच्या आधी एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देखील हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असताना, हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले करत असताना त्यांच्याशी सामना खेळणं चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




























































