
हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या ICC T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये हिंदुस्थानने इंग्लंडचा अवघ्या 7 धावांनी पराभव केला आणि फायनलमध्ये धडक मारली. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धुळ चालत अंतिम फेरीत झेप घेतली होती. आता 8 मार्च रोजी हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विजेतेपदासाठी अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी दोन्ही संघ यापूर्वी अंतिम फेरीत एकमेकांना किती वेळा भिडले आहेत? कोणता संघ ठरलाय वरचढ?
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यापूर्वी 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि 2021 च्या जागतिक कसोटी चॅम्पियशनीपच्या फायनलमध्ये आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दोन्ही संघ एकमेकाना भिडले आहे. आकड्यांच्या विचार करता 2000 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव केला होता. त्यानंतर 2021 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही न्यूझीलंडचा वरचष्मा राहिला आणि त्यांनी टीम इंडियाचा 8 विकेट पराभव करत जेतेपदट पटकावले. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत भिडले. मात्र, यावेळी टीम इंडियाने बाजी न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला. आतापर्यंत दोन्ही संघ तीन वेळा अंतिम फेरीत भिडले असून दोन वेळा न्यूझीलंडने आणि एक वेळा टीम इंडियाने विजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.




























































