#ICCWorldCup विकेटचा ‘चौकार’, 2007 मध्ये मलिंगाचा तो स्पेल धम्माल उडवून गेला

72

सामना ऑनलाईन । मुंबई

2007 मध्ये झालेला वर्ल्डकप अनेक कारणांनी गाजला. ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आणि विक्रम केला. यासह श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने विश्वचषकात आपल्या धारधार गोलंदाजीने फलंदाजांना जखडून ठेवले. मलिंगाने एका लढतीत सलगच्या चार चेंडूवर चार बळी घेत खळबळ उडवून दिली होती. मलिंगाचा हा विक्रम आगामी काळात मोडणे अशक्य आहे.

Photo : 1975 ते 2015, आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे विजेते

विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात मलिगांने सलगच्या चार चेंडूवर चार बळी घेतले होते. मलिंगाने 45 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर दोन बळी आणि त्यानंतर 47 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन बळी घेत अनोखा विक्रम नोंदवला होता. चार चेंडूत चार बळी घेऊनही मलिंगा श्रीलंकेला विजय मिळवून देऊ शकला नाही. श्रीलंकेने हा सामना अवघ्या एका विकेटने गमावला होता.

#ICCWorldCup वर्ल्डकपमध्ये फक्त 36 धावांत ‘या’ संघाचा खुर्दा उडाला
आपली प्रतिक्रिया द्या