सिद्धिविनायक मेट्रो रेल्वे स्थानकासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डचे ब्रँडिंग

मुंबई मेट्रो लाईन थ्री (अ‍ॅक्वा लाईन) या मार्गावरील सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे ब्रँडिंग आयसीआयसीआय लोम्बार्ड करणार आहे. याबाबतचे अधिकार बँकेला मिळाले आहेत. त्यामुळे प्रभादेवीतील प्रतिष्ठत श्री सिद्धिविनायक मंदिराशेजारी असलेले हे मेट्रोस्थानक आता आयसीआयसीआय लोम्बार्ड सिद्धिविनायक मेट्रो स्थानक या नावाने ओळखले जाणार आहे.

या स्थानकावर हिंदुस्थानातील पहिले थ्री डी अ‍ॅनामॉर्फिक स्क्रीन उभारण्यात आले असून या स्थानकाचे हे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. या स्क्रीनच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि कथाकथन प्रवाशांचा जाहिरातींचा अनुभव आणखी उत्तम करतील. याशिवाय मेट्रोस्थानकात आरोग्य आणि कगल्याण केंद्र उभारण्यात आले असून या केंद्रात रेल्वेप्रवासी रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि ताणतणावाची पातळी यांसारख्या महत्वाच्या तपासण्याही करून घेऊ शकतात. या माध्यमातून मुंबईकर मेट्रो प्रवाशांना आरोग्याचीही काळजी घेता येणार आहे.