
सामना ऑनलाईन। इजिप्त
इजिप्तमधील काहीरा भागात सुमारे 3000 हजार वर्षापूर्वीची थडकी सापडली असून त्यात एक पुजारी व त्याच्या पत्नीचे ममीज सापडले आहे. एका भुयाराचे खोदकाम करताना त्यात ही दोन थडगी फ्रान्सच्या पुरातत्व विभागाच्या टीमला सापडली आहेत.

काही दिवसांपू्र्वीच या टीमला याच भागात खोदकाम करताना 6 हजार वर्षापूर्वीची एक दफनभूमी सापडली होती. त्यात अर्धा डझनहून अधिक मांजरींचे ममीजही सापडले होते. या भागात अजूनही काही पुरातन वस्तू सापडतील ज्यातून अनेक रहस्यांचा उलगडा होईल असा अंदाज या टीमने व्यक्त केला आहे. इंजिप्तच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या ममीजचे परिक्षण केले आहे.




























































