नांदेडची आयआयबी बेस्ट एज्युकेशन लिडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य आणि देशपातळीवरच्या सीईटी तसेच नीट प्रवेश पूर्व परिक्षेत सर्वोत्तम ठरलेला नांदेडच्या आयआयबीला एबीपी माझा वृत्तवाहिनीतर्फे गौरविण्यात आले आहे. बायोलॉजी विषयात आयआयबीतर्फे देशात नीट सारख्या परिक्षेत गुणांचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल महाराष्ट्रा बेस्ट एज्युकेशन लिडर्स अ‍ॅड इन्स्टिट्यूशन अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले आहे.

संभाजीनगर येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये एबीपी माझातर्फे शानदार पुरस्कार प्रदान सोहळा घेण्यात आला. आयआयबीचे प्रतिनिधी प्रविण कोहले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बारावी बोर्ड, वैद्यकीय प्रवेशपूर्व राज्य परीक्षा सीईटी आणि राष्ट्रीय नीट परिक्षेत आयआयबी टीमने दिलेल्या कठोर परिश्रमाचे कौतुक म्हणजे हा अवॉर्ड आहे, अशी भावना यावेळी आयआयबीचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

नांदेड येथील आयआयबी मागील दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अलौकिक कार्य करीत आहे. वैद्यकीय प्रवेश पूर्वपरिक्षा सीईटी आणि राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट परिक्षेसाठी आयआयबीतर्फे बायोलॉजी विषयाचे मार्गदर्शन केले जाते.

आयआयबीच्या सूक्ष्म मार्गदर्शनात आतापर्यंत हजारो विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश पात्र ठरले आहेत. मागील २० वर्षाच्या कालावधीत डॉक्टर होवून शेकडो विद्यार्थी समाजसेवेचे कार्य करीत आहेत. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांचे एमबीबीएस प्रवेशाचे स्वप्न साकार करण्याचा ध्यास घेतलेल्या आयआयबीचे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात तब्बल १०५९ विद्यार्थी एमबीबीएससाठी प्रवेश पात्र झाले आहेत. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६३१, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३८ तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल २९० विद्यार्थ्यांंनी एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, असेही आयआयबीचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी जवळपास २७०० विद्यार्थ्यांची एमबीबीएस प्रवेशासाठी निवड केली जाते. यावर्षी नांदेडच्या आयआयबी चेच १०५९ विद्यार्थी राज्यातल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश पात्र झाले आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.