
थायलंडची राजधानी बैंकॉक येथील एका बारमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागली, या अग्नितांडवात २७ जणांचा मृत्यू झाला असून ६३ जण जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर बारमध्ये स्फोट झाला, त्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. मात्र बाहेर पडता न आल्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. ‘राँग बीअर ना लाट फ्राओ’ असे या पब बारचे नाव आहे. हा वार बैंकॉकच्या चाटुचक जिल्ह्यात आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. स्टेजजवळ एका सर्किट ब्रेकरमधून धूर निघायला लागला. त्यानंतर तेथे स्फोट झाला. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. छतावरील ज्वलनशील सजावटीमुळे आग वेगाने पसरली, असा अंदाज आहे. उपस्थितांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयात धाव घेतली, जिथे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
पार्किंग केलेल्या कारमधून ८ तोळे सोने लंपास
मुंबई : इमारतीखाली पार्क केलेल्या कारमध्ये मालकीण आठ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग विसरली. शोधाशोध केल्यावर ते दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. बरीच शोधाशोध केल्यानंतरही दागिन्यांची बंग न सापडल्याने त्यांनी विक्रोळी पोलिसांत धाव घेतली, पोलिसांनी विवाहितेने सांगितले त्याप्रमाणे मेडिकल, वडापाव सेंटर येथे जाऊन तपास केला. सीसीटीव्हीची तपासणी केल्यावर पार्किंग करणारा चालक एका गाडीच्या मागे संशयास्पद हालचाल करताना व तो त्यानंतर कामावर गैरहजर असल्याचे आढळून आले. विक्रोळी पोलिसांनी कसून तपास केल्यावर कार पार्क करणाऱ्याने दागिन्ऱ्यांवर डल्ला मारल्याचे लक्षात आले. पोलिसांनी लगेच माग काढत आरोपीला झाशी येथून पकडून आणत दागिने हस्तगत केले.
पवईत क्षुल्लक वादातून सहकाऱ्याची हत्या
मुंबई : क्षुल्लक वादातून सहकाऱ्याने सहकाऱ्याची हत्या केल्याची घटना पवई येथे घडली. फेकान महतो असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी अजित भोला महतोला पवई पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. फेकान आणि अजित हे दोघे मूळचे बिहारचे रहिवासी असून ते पवई येथील एका कॅण्टीनमध्ये काम करत होते. शनिवारी रात्री फेकान आणि अजितमध्ये क्षुल्लक वाद झाला. तेव्हा प्रितेशकुमारने मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. भांडणानंतर अजितने फेकानला स्लायडिंगच्या दिशेने धववा दिला. तेव्हा स्लायडिंगची काच फुटून त्याला दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. फेकानया उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पवई पोलीस घटनास्थळी आले. प्रितेशकुमारच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजित विरोधात गुन्हा नोंद केला. पळून गेलेल्या अजितला पोलिसांनी अटक केली





























































