#INDvSA पुणे कसोटीमध्ये टीम इंडियाने पाडला विक्रमांचा पाऊस

3975

पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने आफ्रिकेचा डावाने पराभव केला. टीम इंडियाने आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 189 धावांमध्ये गुंडाळला आणि एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला. या कसोटीसह टीम इंडियाने तीन कसोटी सामन्यांची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात नाबाद 254 धावा करून टीम इंडियाला 600 धावांचा डोंगर उभारून देणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कसोटी विजयासह टीम इंडियाने अनेक विक्रम नोंदवले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला
टीम इंडियाने आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला आहे. 2012-13 पासून ते आतापर्यंत टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 11 वी कसोटी मालिका जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने 1994-95 ते 2000-01 या दरम्यान घरच्या मैदानावर खेळताना सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. आता हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाला आहे.

टीम इंडियाचा पुणे कसोटीत डावाने विजय, मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी

पहिल्या 50 कसोटीत सर्वाधिक विजय
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार व्हीव्ह रिचर्डस यांचा विक्रम मोडला आहे. विराटने पहिल्या 50 कसोटीमध्ये 30 वा विजय मिळवला आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह वॉ 37 कसोटी विजयासह पहिल्या आणि रिकी पॉन्टिंग 35 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रिचर्डस यांनी पहिल्या 50 कसोटीत 27 विजय मिळवले होते.

विराट चमत्कार!

विराटचा पराक्रम
कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकीर्दीतील सातवे द्विशतक झळकावले. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा टप्पाही ओलांडला. या द्विशतकासह विराटने सचिन आणि सेहवाग यांचा सहा द्विशतकांचा विक्रमही मोडला.

आपली प्रतिक्रिया द्या