
मायभूमीत ‘हमसे जो टकाराएगा, मिट्टी में मिल जाएगा’, हे हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले आणि हिंदुस्थानातील मालिका विजयाचा झेंडा अपराजित ठेवला. इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसोटीतील पराभवानंतर हिंदुस्थानने विजयाची हॅट्ट्रिक साजरी करीत पाच सामन्यांची कसोटी मालिका आधीच 3-1 ने खिशात घातली. हिंदुस्थानने 2013 पासून सुरू झालेला कसोटी मालिका विजयाचा झेंडा सलग 17 व्या कसोटीतही फडकत ठेवला. एवढेच नव्हे तर, गेल्या दोन वर्षांत इंग्लंडच्या वेगवान बॅझबॉल खेळाला फुटबॉलप्रमाणे किक मारत फेल ठरवले.
रांचीतील चौथ्या कसोटीत हिंदुस्थानने 61 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 192 धावांचे लक्ष्य गाठत पाहुण्या इंग्लंड संघावर साडेतीन दिवसांतच मालिका विजय साकारला. मायदेशातील हिंदुस्थानचा हा सलग 17वा कसोटी मालिका विजय होय हे विशेष! पदार्पणवीर आकाश दीप, ध्रुव जुरेल, यशस्वी जैसवाल व शुभमन गिल या युवाशक्तीने रांची कसोटी जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा व कुलदीप यादव या अनुभवी फिरकी त्रिकुटाचीही कामगिरी विसरता येणार नाही. दोन्ही डावात संकटमोचक ठरलेला यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल या कसोटी विजयाचा शिल्पकार ठरला.
गिल-जुरेलने इंग्लंडचे स्वप्न भंगवले
हिंदुस्थानचा डाव संकटात असताना दुसऱया क्रमांकावर आलेला शुबमन गिल (नाबाद 52) व सहाव्या क्रमांकावर आलेला ध्रुव जुरेल (नाबाद 39) यांनी इंग्लंडचे विजयाचे स्वप्न भंगवले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी करीत हिंदुस्थानला सलग तिसरा कसोटी विजय मिळवून दिला. गिलने 124 चेंडूंच्या खेळीत 2 षटकारांसह आपली नाबाद खेळी सजविली, तर जुरेलने 77 चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीरने 3, तर जो रुट व टॉम हार्टली यांनी 1-1 बळी टिपला.
रोहित, जैसवालची दमदार फलंदाजी
इंग्लंडकडून मिळालेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱया हिंदुस्थानने तिसऱया दिवसाच्या बिनबाद 40 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा (55) व यशस्वी जैसवाल (37) यांनी 84 धावांची सलामी दिली. जो रूटने जैसवालला अॅण्डरसनकरवी झेलबाद करुन ही जोडी पह्डली.
बशीरच्या फिरकीने सामन्यात रंगत
हिंदुस्थानची सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर शोएब बशीरने सामन्यात रंगत निर्माण केली. रजत पाटीदार (0), रवींद्र जाडेजा (4) व सरफराज खान (0) यांना बाद करीत त्याने हिंदुस्थानची 5 बाद 120 अशी दुर्दशा केली. जाडेजा व सरफराज यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले.
जैसवालने केली कोहलीची बरोबरी
यशस्वी जैसवालच्या 37 धावांच्या खेळीमुळे जैसवालने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. कोहलीने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 655 धावा केल्या होत्या. जैसवालने इंग्लंडविरुद्ध चार कसोटींत 2 शतके व 2 अर्धशतकांच्या जोरावर 655 धावा करीत कोहलीला गाठले. आता पाचव्या कसोटीत केवळ एक धाव घेतली तरी जैसवालकडून कोहलीचा हा विक्रम मोडीत निघणार आहे.
‘ही खूप कठीण मालिका होती. चार कसोटी सामन्यांनंतर 3-1 अशा स्थितीत येणे आमच्यासाठी सुखावणारे. आमच्यासमोर अनेक आव्हाने आली, पण आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. देशांतर्गत क्रिकेट आणि स्थानिक क्लबमधून येथे येणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, नव्या दमाच्या खेळाडूंकडून मिळालेला प्रतिसाद काwतुकास्पद आहे. जुरेलने फलंदाजीमध्ये संयम दाखवला आणि चौफेर फटके मारले. पहिल्या डावातील त्याच्या 90 धावा अतिशय महत्त्वाच्या होत्या. दुसऱया डावातही त्याची आणि गिलची भागीदारी महत्त्वाची होती. त्याने शुबमन गिलसह दबाव चांगला हाताळला.’
– रोहित शर्मा, कर्णधार
दृष्टिक्षेपात…
हिंदुस्थानचा मायदेशातील सलग 17वा कसोटी मालिका विजय.
– जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी संघ न्यूझीलंडनंतर दुसऱया स्थानी कायम. – मायदेशात 200च्या आतमधील धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची परंपरा राखली. 33 पैकी 30 कसोटींत विजय, तर 3 सामने ड्रॉ. – जैसवालने 8 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 971 धावा फटकावत सुनील गावसकर (938) यांचा विक्रम मोडला. याचबरोबर 8 कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तो क्रिकेटविश्वातील दुसऱया क्रमांकाचा फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन यांचे 1210 धावांसह अव्वल स्थान कायम आहे. – ध्रुव जुरेल कसोटीत ‘सामनावीर’ ठरलेला हिंदुस्थानचा दुसरा युवा क्रिकेटपटू ठरला. त्याने 23 वर्षे 33 दिवसांचा असताना ‘सामनावीर’ किताब जिंकला. अजय रात्राने 20 वर्षे 148 दिवस इतके वय असताना 2002 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात




























































