हिंदुस्थान अमेरिकेचा ‘चांगला मित्र’ मोदींसोबत काम करायची ट्रम्प यांची इच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

हिंदुस्थान हा अमेरिकेचा खूप चांगला मित्र असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यापुढेही काम करत राहण्याची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा असल्याचे अमेरिकन प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले. वॉशिंग्टन येथे मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनी सांगितले की, हिंदुस्थानात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निष्पक्षपातीपणावर तसेच विश्वासार्हतेवर अमेरिकेचा पूर्ण भरवसा आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि परराष्ट्रमंत्री पोम्पेओ यांच्या अमेरिका प्रशासनाने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजप पक्षाने यंदाच्या निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॉर्गन ऑर्टागस यांनी सांगितले. मॉर्गन म्हणाले की, मोदी यांच्यासोबत आम्ही आधीही एकत्र काम केले आहे आणि यापुढेही काम करायला आम्हाला आवडेल. अनेक मुद्दय़ांवर हिंदुस्थानशी आम्ही चर्चा करून निर्णय घेणार आहोत, असेही मॉर्गन म्हणाले.