देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात आढळले 45 हजारहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. शनिवारी 50 हजारहून अधिक रुग्ण आढळले होते. आज ही संख्या 45 च्या घरात आहे.

गेल्या 24 तासात कोरोनाचे 45 हजार 674 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 85 लाख 7 हजार 754 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 559 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 26 हजार 121 वर पोहोचला आहे.

असे असले तरी आतापर्यंत 78 लाख 68 हजार 968 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 12 हजार 665 इतकी आहे. गेल्या 24 तासात 49 हजार 82 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.