
सामना ऑनलाईन । मुंबई
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या 13 सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. मालिकेत हिंदुस्थान 2-1 असा आघाडीवर असून इतिहास रचण्याची संधी विरोट सेनेकडे आहे.
चौथ्या कसोटीसाठी सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाज उमेश यादव, फिरकीपटू अश्विन आणि कुलदीप यादवला यात स्थान देण्यात आले आहे. आर. अश्विन अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. तसेच मेलबर्न कसोटीत विजयाचा साक्षीदार असलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. इशांतला पाठदुखीचा त्रास झाल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही, असे टीम इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
India name 13-man squad for SCG Test: Virat Kohli (C), A Rahane (VC), KL Rahul, Mayank Agarwal, C Pujara, H Vihari, R Pant, R Jadeja, K Yadav, R Ashwin, M Shami, Jasprit Bumrah, Umesh Yadav
A decision on R Ashwin’s availability will be taken on the morning of the Test #AUSvIND pic.twitter.com/4Lji2FExU8
— BCCI (@BCCI) January 2, 2019
राहुलला पुन्हा संधी
अॅडलेड आणि पर्थ कसोटीत खराब कामगीरीमुळे मेलबर्न कसोटीला मुकलेल्या राहुलला सिडनी कसोटीत पुन्हा संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा बाप झाल्याने हिंदुस्थानात परतला असून त्याच्या जागी राहुलला संधी दिल्याचे मानले जात आहे. परंतु राहुल सलामीला येणार की सहाव्या स्थानावर खेळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
चौथ्या कसोटीसाठी संघ –
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव




























































