
देशातील आरोग्य क्षमता दुपटीने वाढूनही 2014 पर्यंत देशात 43 लाख परिचारिकांची गरज असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रति एक हजार लोकसंख्येमागे तीन परिचारिकांची गरज असल्याचा निष्कर्ष ‘#नर्समिडवाईफ 4 चेंज’ या मोहिमेतून निघाला आहे.
कोरोनामुळे हिंदुस्थानातील आरोग्यसेवा यंत्रणेच्या भक्कम आणि दुबळी अशा दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. कोरोनाकाळात आरोग्य कर्मचाऱयांनी जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. एकीकडे या कर्मचाऱयांचे काwतुक होत असतानाच साथीच्या आजारात देशातील आरोग्य कर्मचाऱयांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्यांचे शिक्षण, सेवा आणि नेतृत्वगुण यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्याचीही गरज आहे. ‘स्टेट ऑफ वर्ल्डस नर्सिंग इंडिया’नुसार हिंदुस्थानातील साधारण 47 टक्के आरोग्य कर्मचारी या परिचारिका किंवा सुईण आहेत. प्रति 1000 लोकांमागे आपल्याकडे 1.7 परिचारिका असून जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार देशात प्रति 1000 लोकसंख्येमागे 3 परिचारिका असणे गरजेचे आहे. गेल्या दोन दशकांमध्ये आपली क्षमता दुपटीने वाढवूनही जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेली मानके साध्य करण्यासाठी 2024 पर्यंत आणखी 43 लाख परिचारिकांची गरज आहे.
- परिचारिका व सुईणी व्यावसायिक संघटनांनी एकत्र येत देशातील दोनतृतीयांश आरोग्य कर्मचाऱयांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी ‘#नर्समिडवाईफ 4 चेंज’ ही मोहीम राबविली आहे. शिक्षण, सेवा आणि नेतृत्वगुणांच्या माध्यमातून परिचारिकांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या मोहिमेतून केला जाणार आहे. ‘ऑल इंडिया गव्हर्न्मेंटनर्सिंग नर्सेस फेडरेशन (एआयजीएनएफ), ट्रेंड् नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (टीएनएआय), ‘सोसायटी ऑफ मिडवाईव्हज इंडिया’ (सोमी), ‘इंडियन नर्सिंग काैन्सिल’ (आयएनसी), इंटरनॅशनल काwन्सिल ऑफ नर्स (आयसीएन) यांनी ही मोहीम राबविली आहे.

























































