#INDvAUS – टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम, ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सने पराभव

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघातील निर्णायक सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानात रंगला. या लढतीत टीम इंडियाने पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 287 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 15 चेंडू राखून गाठले.

सलामीवीर रोहित शर्मा याचे वादळी शतक (119) आणि कर्णधार विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी केलेले अर्धशतक (89) टीम इंडियाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. श्रेयस अय्यर याने नाबाद 44 धावांची उपयुक्त खेळी केली.

रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम, धोनी-पॉन्टिंगला जे जमलं नाही ते ‘करून दाखवलं’

बंगळुरुतील सामना जिंकत टीम इंडियाने मालिका 2-1 अशी जिंकली. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर यजमान टीम इंडियाने राजकोट आणि बंगळुरुतील सामना जिंकत घरच्या मैदानावर या वर्षातील दुसऱ्या मालिका विजयाची नोंद केली.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 286 धावा केल्या आणि टीम इंडियापुढे विजयासाठी 287 धावांचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने 131 धावांची शतकी खेळी केली, तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रभावी मारा करत सर्वाधिक 4 बळी घेतले. जाडेजाने 2, तर कुलदीप आणि सैनीने प्रत्येकी 1 बळी घेतला.

 • विराट कोहली 89 धावांवर बाद
 • हिंदुस्थानच्या 250 धावा पूर्ण
 • 60 चेंडूत 63 धावांची आवश्यकता
 • 40 षटकात 2 बद 224 धावा
 • बाद होण्यापूर्वी 128 चेंडूत 119 धावा ठोकल्या
 • टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित शर्मा बाद
 • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
 • एक दिवसीय कारकीर्दीतील 57 वे अर्धशतक
 • कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक

 • 35 षटकानंतर 1 बाद 192 धावा
 • विराट कोहली-रोहित शर्मामध्ये 100 धावांची भागिदारी
 • 30 षटकानंतर 1 बाद 156 धावा
 • ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे वन डे मधील 29 वे शतक

 • हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर 1 बाद 128 धावा
 • कर्णधार विराटच्या 5 हजार धावा पूर्ण

 • विराट कोहली-रोहित शर्मामध्ये 50 धावांची भागिदारी
 • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
 • 20 षटकानंतर टीम इंडियाच्या 1 बाद 96 धावा
 • एक दिवसीय कारकीर्दीतील 44 वे अर्धशतक
 • रोहित शर्माचे अर्धशतक

 • 15 षटकानंतर 1 बाद 80 धावा
 • अॅस्टन एगरने 19 धावांवर केले बाद
 • टीम इंडियाला पहिला धक्का, राहुल बाद
 • 10 षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 61 धावा
 • टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण

द्विशतकांचा ‘बादशहा’ रोहितचा पराक्रम; एकाच डावात तेंडुलकर-गांगुलीचा विक्रम मोडला

 • रोहित शर्माच्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण

 • 2 षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 10 धावा
 • टीम इंडियाची फलंदाजी सुरु, राहुल-रोहित मैदानात
 • टीम इंडियाला विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाविरुद्ध काळी पट्टी बांधून उतरला हिंदुस्थानचा संघ, वाचा काय आहे नक्की कारण

आपली प्रतिक्रिया द्या