
हिंदुस्थानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही बाजी मारली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर 3 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामान्यांसोबतच हिंदुस्थानने ही एकदिवसीय मालिका आपल्या नावे केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो आणि असालांकाच्या अर्धशतकच्या दमावर श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 275 धावा केल्या. टीम इंडियाने 49.1 षटकांत 7 गडी गमावून 276 धावांचे लक्ष्य गाठले.




























































