रोमहर्षक लढतीत टीम इंडियाचा विंडीजवर 4 विकेट्ने विजय, सामन्यासह मालिका खिशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कटकमध्ये झालेल्या निर्णायक लढतीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा 4 विकेट्सने पराभव करत वर्षाचा शेवट मालिका विजयाने केला. वेस्ट इंडीजने दिलेल्या 316 धावांचे आव्हान टीम इंडियाने 49 व्या षटकामध्ये पूर्ण केले. सहा खेळाडू बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी नाबाद भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाला सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 100 धावांची दणदणीत सलामी दिली. रोहित शर्माने 63 आणि राहुलने 77 धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार विराट कोहलीने 85 धावांची खेळी केली आणि जाडेजासोबत मिळून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले.

तत्पूर्वी वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियापुढे विजयासाठी 316 धावांचे आव्हान ठेवले आहे. निकोलस पूरनने 64 चेंडूतील 89 आणि कर्णधार केरॉन पोलार्डने 51 चेंडूत 74 धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नवदीप सैनीने 2, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 1 बळी घेतला.

मोहम्मद शमी ठरला ‘विकेट्स’चा बॉस; अनोख्या विक्रमासह कपिल देव, आगरकरला मागे सोडले

  • टीम इंडियाच्या 300 धावा पूर्ण
  • बाद होण्यापूर्वी केल्या 85 धावा
  • कर्णधार विराट कोहली बाद
  • 45 षटकानंतर टीम इंडियाच्या 5 बाद 278 धावा
  • टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण
  • 40 षटकानंतर टीम इंडियाच्या 5 बाद 237 धावा
  • टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी, जाधव बाद
  • एक दिवसीय कारकीर्दीतील 55 वे अर्धशतक
  • कर्णधार विराटचे अर्धशतक

  • अखेरच्या 15 षटकात 115 धावांची आवश्यकता
  • 35 षटकानंतर 4 बाद 201 धावा
  • टीम इंडियाला चौथा धक्का, पंत बाद
  • टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
  • टीम इंडियाला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर बाद
  • बाद होण्यापूर्वी केल्या 77 धावा
  • टीम इंडियाला दुसरा धक्का, राहुल बाद
  • टीम इंडियाच्या 150 धावा पूर्ण
  • 25 षटकानंतर टीम इंडियाच्या 1 बाद 141 धावा
  • बाद होण्यापूर्वी केल्या 63 धावा
  • टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

‘हिटमॅन’ रोहित शर्माचा भीमपराक्रम, जयसूर्याचा 22 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला

  • 20 षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 113 धावा
  • रोहित शर्माचे अर्धशतक
  • 17 षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 102 धावा
  • लोकेश राहुलचे एक दिवसीय कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक

  • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
  • 10 षटकानंतर टीम इंडियाच्या बिनबाद 59 धावा
  • टीम इंडियाची दमदार सुरुवात, बिनबाद अर्धशतक फलकावर

  • तीन षटकानंतर बिनबाद 15 धावा
  • रोहित शर्मा-लोकेश राहुल मैदानात
  • टीम इंडियाची फलंदाजी सुरू
  • विंडीजच्या 50 षटकात 5 बाद 315 धावा

  • कर्णधार पोलार्डचे अर्धशतक
  • शार्दुलने 89 धावांवर केले बाद
  • विंडीजचा निम्मा संघ माघारी, पूरचे शतक हुकले
  • विंडीजच्या 250 धावा पूर्ण
  • पूरन-पोलार्डमध्ये 100 धावांची भागिदारी
  • 45 षटकानंतर चार बाद 238 धावा
  • एक दिवसीय कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक
  • निकोलस पूरनचे अर्धशतक

  • विंडीजच्या 200 धावा पूर्ण
  • 40 षटकानंतर 4 बाद 197 धावा
  • 35 षटकानंतर चार बाद 161 धावा
  • विंडीजच्या 150 धावा पूर्ण
  • चेस 38 धावांवर बाद
  • विंडीजला चौथा धक्का, सैनीने घेतला दुसरा बळी

  • 30 षटकानंतर तीन बाद 137 धावा
  • नवदीप सैनीने घेतला आंतरराष्ट्रीय वन डे मधील पहिला बळी
  • विंडीजला तिसरा धक्का, हेटमायर बाद
  • 25 षटकानंतर दोन बाद 94 धावा
  • 20 षटकानंतर दोन बाद 70 धावा
  • शमीच्या गोलंदाजीवर होप 42 धावांवर बाद
  • विंडीजला दुसरा धक्का, शाई होप बाद

  • 15 षटकात वेस्ट इंडिजच्या 1 बाद 57 धावा
  • 14 व्या षटकात लुइस बाद
  • पाच षटकात वेस्ट इंडिजच्या 18 धावा
  • पहिल्या षटकात वेस्ट इंडिजची अवघी 1 धाव
  • एलविन ल्युईस आणि शाय होप मैदानावर
  • वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरुवात
  • दीपक चहरच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान

  • नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा गोलंदाजीचा निर्णय