आशिया कप स्पर्धेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2023 होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार नाही असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे. पाकिस्तानात ही स्पर्धा झाल्यास हिंदुस्थानी संघ पाकिस्तानचा दौरा करेल असा कयास बांधला जात होता. मंगळवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 2023 साली होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचाही विषय चर्चेसाठी आणण्यात आला होता.

बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटलंय की, बीसीसीआयने निर्णय घेतलाय की आशिया चषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे आशिया चषक स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ विजयी झाला होता. ही स्पर्धा आधी श्रीलंकेत खेळवण्यात येणार होती, मात्र तिथली परिस्थिती चिघळल्याने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आली होती.