
सामना प्रतिनिधी । मुंबई
काम आणि आर्थिक चणचणीमुळे हिंदुस्थानी जगात सर्वाधिक तणावग्रस्त बनले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरकडे गेल्यावर अधिक पैसे देऊ लागू नयेत, म्हणून लोक आपला ताणतणाव लपवून ठेवतात. हिंदुस्थानी व्यक्ती अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या विकसित देशांच्या तर चीन, ब्राझिल आणि इंडोनेशिया विकसनशील देशांपेक्षा जास्त तणावग्रस्त आहे. त्यातच आठ हिंदुस्थानींपैकी एकाला तणावाशी मुकाबला करणे अशक्य जाते, असेही सिगना टीटीके हेल्थ इश्युरन्सने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. सर्वेक्षणात २३ देशांमधील १४ हजार ५०० लोकांचा सहभाग होता.




























































