हिंदुस्थानी लष्कराची पाकिस्तानात दिवाळी; पाक लष्कराचे मुख्यालयच उडवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानात दिवाळी साजरी केली! 23 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थानी हद्दीत करण्यात आलेल्या तोफहल्ल्याचा सूड उगवत हिंदुस्थानी लष्कराने पुंछ सीमेवर असलेले पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालयच उडवले. या कारवाईत पाकडय़ांचे जबर नुकसान झाले आहे.

21 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी लष्कराच्या बॅट पथकाने केलेल्या हल्ल्यात हिंदुस्थानचे तीन जवान शहीद झाले होते. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी लष्कराने पुंछ व झल्लाह चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला. या घटनांमुळे सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 23 ऑक्टोबरलाच दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हॉटलाईनवर चर्चाही केली. याच दिवशी या दोन्ही हल्ल्याचा सूड हिंदुस्थानी लष्कराने उगवला. पुंछ सीमेपासून 20 किमी अंतरावर पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय आहे. हिंदुस्थानी जवानांनी या मुख्यालयालाच निशाणा बनवले. हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय पूर्णतः उद्ध्वस्त झाले. लष्कराच्या या कारवाईचे सॅटेलाईट छायाचित्र आज समोर आले.

हिंदुस्थानी लष्कराने सर्जिकल स्ट्राईकप्रमाणेच ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यास दुजोरा मिळाला नाही. यापूर्वी 19 मे रोजी हिंदुस्थानी लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचा बंकर उडवला होता.

summary- indian army destroyed pakistan army office