अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी नागरिकांवरील हल्ले थांबण्याचे नाव नाही. गेल्या काही दिवसांपासून येथे हिंदुस्थानी वंशाचे नागरिक आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. ताजी घटना वाशिंग्टनमध्ये घडली असून एका उपहारगृहाबाहेर हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकावर अज्ञात व्यक्तीने क्षुल्लक वादातून जीवघेणा हल्ला केला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. विवेक चंदर तनेजा (वय – 41) मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास वाशिंग्टनच्या डाऊनटाऊनमधील एका उपहारगृहाबाहेर ही घटना घडली. क्षुल्लक वादातून एका अज्ञात व्यक्तीने विवेक यांच्या डोक्यावर वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्याची माहिती मिलताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा विवेद रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 7 फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
विवेक तनेजा हा व्हर्जिनियामध्ये एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करत होते. त्यांच्या हत्येचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणाला अटक केलेली नाही. ही हत्याच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयिताचा शोध घेतला जात आहे.
Indian student attacked us : हिंदुस्थानी तरुणावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला
दरम्यान, अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना निशाणा बनवले जात आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या हल्ल्यात हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
याआधी अमेरिकन पासपोस्ट असणारा हिंदुस्थानी वंशाच्या 19 वर्षीय श्रेयस रेड्डी बेनिगर याचा मृतदेह सापडला होता. तर त्याआधी नील आचार्य या विद्यार्थ्याचा पर्ड्यू विश्वविद्यालयात मृतदेह आढळला होता. तत्पूर्वी 16 जानेवारी रोजी हरयाणाच्या 25 वर्षीय विवेक सैनी याची जॉर्जियाच्या लिथोनिया येथे एका व्यक्तीने हत्या केली होती.
ज्याला आधार दिला, त्यानेच काटा काढला; हिंदुस्थानी विद्यार्थ्याची अमेरिकेत निर्घृण हत्या