पोटाला खाण्यासाठी बाहेर गेला, अन् जिवाला मुकला; मित्राने सांगितली काळीज पिळवटून टाकणारी व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाने युक्रेनच्या खारकीव्ह शहरामध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नवीन शेखरप्पा ग्यानगौडर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा कर्नाटकमधील रहिवासी होती. खाण्या-पिण्याच्या शोधामध्ये बाहेर पडला असताना झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. बंकरमध्ये त्याच्यासोबत राहणाऱ्या आणखी एका हिंदुस्थानी तरुणाने काळीज पिळवटून टाकणारी ही व्यथा माध्यमांना सांगितली आहे.

युक्रेन माघार घेत नसल्याने रशियन लष्कराने तुफान हवाई हल्ले चढवून खारकीव्हमध्ये विध्वंस केला आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत नवीन याचा वर्गमित्र श्रीकांत हा देखील खारकीव्हमध्ये अडकला असून त्याने ‘इंडिया टूडे’शी बोलताना आपली व्यथा सांगितली. नवीन कर्नाटकमधीस रहिवासी होता आणि खारकीव्हमध्ये मेडीकलचे शिक्षण घेत होता. सकाळी खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि आवश्यक सामान घेण्यासाठी तो बंकारच्या बाहेर आला होता. त्याचवेळी हल्ला झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

श्रीकांतने सांगितले की, एक मार्ज रोजी सकाळी तो बंकारमध्ये पडला होता. पोटाला खाण्यासाठी काहीतरी मिळतेय का याचा तो शोध घेत होता. खारकीव्हमध्ये सायंकाळी तीन ते पहाटे सहा पर्यंत कर्फ्यू लागलेला होता, त्यामुळे तो सकाळी सहानंतर बाहेर पडला. आम्ही त्यावेळी झोपेतच होतो. नवीनने बाहेर जाताना आम्हाला काहीही सांगितले नव्हते. बंकरपासून 50 मीटर अंतरावर असणाऱ्या एका स्टोअरवर तो गेला आणि परत आलाच नाही.

युक्रेनचा रशियावर ‘बॉम्ब’, युरोपियन युनियनचा सदस्य होण्याची प्रक्रीया सुरू

आम्ही नवीनला फोन करत होतो, पण तो फोन उचलत नव्हता. अखेर एका व्यक्तीने फोन उचलला आणि तिथे काय घडले हे आम्हाला कळाले. यानंतर आमच्या प्रमुखांनीही या वृत्ताला दुजोरा दिला, असे श्रीकांतने सांगितले. तसेच खारकीव्हमध्ये गोळीबार होत असून तो बंकरबाहेर गेलाच का असा प्रश्न आम्हाला पडल्याचे श्रीकांतने सांगितले.

अधिकाऱ्यांशी संपर्क नाही

तसेच आतापर्यंत कोणत्याही हिंदुस्थानी अधिकाऱ्याशी संपर्क झालेला नाही. दूतावासही काहीच करत नाहीय. ते आम्हाला सांगत आहेत की पश्चिमेकडे जाण्याचा प्रयत्न करा, पण येथे एकही वाहन उपलब्ध नाहीय, असे श्रीकांतने सांगितले. तसेच दूतावासाने काही विद्यार्थ्यांशी संपर्क केला होता आणि आम्हाला येथून बाहेर काढले जाईल असे म्हटले होते. परंतु कधी याचे उत्तर आमच्याकडे नाही, असेही तो म्हणाला.

अमेरिकन सैन्य युद्धात उतरणार नाही, पण युक्रेनच्या इंच-इंच जमिनीचे रक्षण करणार! – बायडेन