इथं मृत्यूनंतरही माणसांना ठेवतात जिवंत, बातमी वाचून व्हाल थक्क…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशिया येथील एक असा समाज आहे, ज्या समाजातील लोक एकमेकांवर इतकं प्रेम करतात की ते मेल्यानंतरही स्वतःपासून वेगळे करत नाहीत. इंडोनेशियाच्या दक्षिण सोलावेसी (South Solawesi) या डोंगराळ भागात राहणाऱ्या तोरजा समाजाची ही प्रथा कदाचित तुम्हाला एखाद्या भय चित्रपटासारखी वाटेल. मात्र हे तितकंच खरं आहे. इथं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी न करता त्याला आपल्यासोबतच ठेवतात आणि त्या मृतदेहाला कुटुंबाचा एक सदस्यच मानतात.

आपल्याकडे मृत्यूनंतर लवकरात लवकर मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात येते. मात्र येथील लोक मृत्यूनंतरही आपल्या लोकांची साथ सोडत नाहीत. त्या मृतदेहाला फक्त ते सदस्य मानतात इतकंच नाही तर ते रोज त्याला अंघोळही घालतात. त्यांना कपडे घालतात, त्यांच्यासाठी स्वादिष्ट पक्वान्न बनवले जातात, त्यांची काळजी घेतली जाते.

त्यांचे शरीर पूर्णतः सुरक्षित रहावे यासाठी Formaldehyde नावाचे पाण्यासारखे दिसणारे रंगहीन रसायन असते, त्याचा वापर त्या मृतदेहांच्या शरीरावर लावण्यासाठी केला जातो. तोरजा समाजातील लोकांचे असे मत आहे की, त्यांना या मृतदेहाची भीती वाटत नाही. तर त्या मेलेल्या व्यक्तिप्रति असणारे प्रेम किंवा आदर अधिक वाटते. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना शैलेश हालभावी यांनी ही माहिती दिली.