
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
स्टेट बॅक ऑफ इंडियाने एफडी म्हणजेच मुदतठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. 179 दिवसांपर्यंतच्या मुदतठेवीवरील व्याज 0.50 ते 0.75 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. तसेच 179 दिवसांवरील ठेवीवरील व्याजदरात 0.20 ते 0.35 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. 1 ऑगस्टपासून हे नवे दर लागू होतील.
स्टेट बँकेने सोमवारी याविषयीची माहिती दिली. 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर 5.75 वरून 5 टक्के, 46 ते 179 दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर 6.25 वरून 5.75 तर 180 ते 210 दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर 6.35 वरून 6.25 इतके तर 211 ते एक वर्ष कालावधीच्या ठेवीवरील व्याजदर 6.4 वरून 6.25 टक्के इतके केले आहे. स्टेट बँकेने 1 ते 2 वर्षांच्या ठेवीवरील व्याजर 7 वरून 6.8 टक्के केला असून त्यापुढील 2 ते 3 वर्ष ठेवीवरील व्याजदर 6.75 वरून 6.7, 3 ते 5 वर्ष ठेवीवरील व्याजदर 6.7 वरून 6.6 तसेच 5 ते 10 वर्षावरील व्याजदर 6.6 वरून 6.5 करण्यात आला आहे.

























































