
अमेरिकेतील मिनेसोटा येथील ट्वीन सिटीज परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. रॉबिन्सन R66 हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. जमिनीवर कोसळताच हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्यांच समोर आलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये नेमकी किती लोक हे अद्याप समजू शकले नाही. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.45 वाजता घडली.
रॉबिन्सन R66 हे एकल-इंजिन टर्बाइन हेलिकॉप्टर आहे. यात पायलट आणि चार प्रवासी बसू शकतात. हेलिकॉप्टरने मिनेसोटा येथील लिडिया येथील स्काय पार्क विमानतळावरून दुपारी 2.35 वाजता एअरलेक विमानतळाकडे उड्डाण केले. त्यानंतर दहा मिनिटांतच ट्विन सिटीज परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले. यात पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) अपघाताचा तपास करत आहेत.