अभिनेते समीर चौघुले यांची मुलाखत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दहिसर शाखेच्या वतीने ‘कलावंत आपल्या भेटीला’ ही मालिका सुरू होत असून पहिल्या भेटीत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार समीर चौघुले यांची मुलाखत घेतली जाणार आहे. रविवार, 18 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता नानासाहेब धर्माधिकारी समाज केंद्र, दुसरा मजला, विठ्ठल मंदिराजवळ, दहिसर पश्चिम येथे हा कार्यक्रम होणार आहे.