पंपांवर राहणार ‘आयओटी’ मॉनेटरिंग, तुंबणाऱ्या ठिकाणांची माहिती मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पाणी तुंबणाऱ्या शंभरांवर ठिकाणी पालिका यावर्षी तब्बल 547 उच्च क्षमतेचे पंप बसवणार असून या सर्व पंपांचे ‘आयओटी’ तत्त्वावर पालिकेच्या पंट्रोल रूममध्ये लाइव्ह प्रक्षेपण राहणार आहे. त्यामुळे किती पंप सुरू आहेत, कुठला पंप बंद आहे याची माहिती मिळणार असून पंपाची लाइव्ह माहिती मिळणार असल्यामुळे आवश्यक कार्यवाही करणे शक्य होणार आहे.

‘आयओटी’ तत्त्वावरील या यंत्रणेमुळे सेन्सरच्या माध्यमातून पंपाची स्थिती पंट्रोल रूममधील डॅशबोर्डवर दिसणार आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये जलद निर्णय घेणे शक्य होणार असल्याचे पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी आज सांगितले. पाणी तुंबू नये यासाठी यात शहर विभागात146, पूर्व उपनगारात 178 आणि पश्चिम उपनगरात 223 पंपांचे संच बसवण्यात येणार आहेत.

कर्मचाऱ्यांवर 24 तास नजर

पंपांच्या ठिकाणी तीन पाळ्यांमध्ये मनुष्यबळ तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या सोबत समन्वयासाठी पंपचालक प्रतिनिधीची नियुक्त आपत्कालीन विभागात करण्यात येईल. पंप चालकाला देण्यात आलेल्या पह्नचे जिओ – फेन्सिंग करण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱयांची हजेरी आणि उपस्थितीवरदेखील नियंत्रण राहणार आहे.